No-Cost EMI on Credit Card : गेल्या काही वर्षांत मध्यमवर्गीयांमध्ये एक ट्रेंड खूप वाढला आहे, वस्तू बजेटमध्ये नसेल तर क्रेडिट कार्डने खरेदी करा आणि त्याचे ईएमआयमध्ये रूपांतर करा. दुकानदारही ग्राहकाला सांगतो, "सर, नो-कॉस्ट ईएमआय आहे, कोणतेही व्याज नाही!" पण खरंच कोणतीही बँक किंवा कंपनी तुम्हाला त्यांचे पैसे वापरण्यासाठी 'फ्री' मध्ये देतात का? याचं उत्तर आहे नाही. कारण, यामध्ये अनेक छुपे खर्च असतात जे आपल्या लक्षात येत नाही.
नो-कॉस्ट ईएमआय म्हणजे 'फ्री' नाही!
- 'नो-कॉस्ट' ईएमआयचा अर्थ फक्त इतकाच आहे की, तुम्हाला दर महिन्याला व्याज वेगळे दाखवले जात नाही. मात्र, सत्य हे आहे की बँक आणि दुकानदार मिळून हे व्याज आधीच वसूल करतात!
- ज्या वस्तूवर सहसा थेट सूट दिली जाते, ती सूट ईएमआय स्कीममध्ये काढून टाकली जाते.
- काहीवेळा वस्तूची एमआरपी थोडी जास्त ठेवली जाते.
- अनेकदा ग्राहकांकडून प्रोसेसिंग फीस वेगळी वसूल केली जाते.
- तुम्हाला वाटत असेल की तुम्ही कोणतेही व्याज न भरता वस्तू घेत आहात, पण प्रत्यक्षात तुम्ही त्यावर ८% ते १६% पर्यंत अतिरिक्त शुल्क देत असता.
प्रोसेसिंग फी आणि GSTप्रत्येक ईएमआय रूपांतरणावर बँक तुम्हाला १९९ ते १,००० रुपयांपर्यंत प्रोसेसिंग फीस आकारते. या शुल्कावर पुन्हा १८% जीएसटी लावला जातो.
- उदाहरणार्थ: समजा तुम्ही ६०,००० रुपयांचा फोन १२ महिन्यांच्या ईएमआयवर घेतला.
- तुम्हाला दर महिन्याला ५,४०० रुपयांचा ईएमआय भरावा लागला, म्हणजे १२ महिन्यांत एकूण ६४,८०० रुपयांचे पेमेंट.
- यावर प्रोसेसिंग फीस आणि जीएसटी मिळून तुम्ही सुमारे ६०० ते १,२०० रुपयांपर्यंत अतिरिक्त पैसे दिले.
- अशा प्रकारे, फोनची किंमत ६५,५०० ते ६६,००० रुपयांपर्यंत जाते. म्हणजे फोन तुम्हाला थेट ६,००० रुपये किंवा त्याहून अधिक महाग पडला.
लवकर बंद केल्यास मोठा दंड
नो-कॉस्ट ईएमआयमध्ये आणखी एक 'गेम' आहे. जर तुमच्याकडे पैसे आले आणि तुम्ही ईएमआय वेळेपूर्वी बंद करण्याचा विचार केला, तर तुम्हाला मूळ रकमेच्या २% ते ३% पर्यंत फोरक्लोजर चार्ज भरावा लागतो. काही बँका सहा महिन्यांपर्यंत ईएमआय लवकर बंद करण्याची परवानगी देत नाहीत.
सिबिल स्कोअरवर थेट परिणामईएमआय सुरू होताच, तुमच्या क्रेडिट कार्डची एक मोठी मर्यादा ब्लॉक होते. यामुळे तुमचा क्रेडिट युटिलायझेशन रेशो (CUR) ७०-८०% पर्यंत वाढतो आणि तुमचा सिबिल स्कोअर लगेच खाली येतो. भविष्यात तुम्हाला कर्ज हवे असल्यास, बँक नकार देऊ शकते.
वाचा - पगार मिळताच अकाउंट होते खाली? '५०-३०-२०' नियमाचा वापर करून ६ महिन्यांत फरक पाहा
ईएमआयवर वस्तू कधी घ्यावी?
- आर्थिक तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, सामान्य परिस्थितीत ईएमआयवर वस्तू खरेदी करणे टाळावे.
- तुमच्यावर खूप मोठा अत्यावश्यक खर्च अचानक आल्यास तुम्ही ईएमआयचा विचार करू शकता.
- जर तुम्हाला खरोखरच ०% व्याज असलेला ऑफर मिळत असेल (जे खूप दुर्मिळ असते), तर तुम्ही ईएमआयचा विचार करू शकता.
- पुढच्या वेळी जेव्हा दुकानदार तुम्हाला 'नो-कॉस्ट आहे सर' म्हणेल, तेव्हा त्याला नक्की विचारा, "यामध्ये नेमकी किती 'कॉस्ट' लपवली आहे?"
Web Summary : No-cost EMIs aren't free. Banks levy processing fees and GST. Early closure attracts penalties. It impacts credit score. Consider EMIs only for emergencies, or rare 0% offers. Ask about hidden costs.
Web Summary : नो-कॉस्ट ईएमआई मुफ्त नहीं है। बैंक प्रोसेसिंग फीस और जीएसटी लगाते हैं। जल्दी बंद करने पर जुर्माना लगता है। यह क्रेडिट स्कोर को प्रभावित करता है। ईएमआई पर केवल आपात स्थिति में या दुर्लभ 0% ऑफ़र पर विचार करें। छिपे हुए खर्चों के बारे में पूछें।